अकोला - अकोला जिल्ह्यातील ई क्लास शेती करण्यासाठी गेल्या 25 ते 35 वर्षांपासून जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, त्या गावातील भुमीहीन रहिवाश्यांनी नागरीकांना गायरान पडीक असलेली जागा मोठ्या कष्टाने मेहनतीने शेतीसाठी कसून ती तयार केलेली असून त्या जमिनीच्या माध्यमातून त्या कष्टकऱ्यांच्या परिवाराचा पालन पोषणाचा प्रश्न निकाली निघत आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने यावर्षी गायरानातील पडीक जमिनीवर शेती करु नये, तेथे झाडे लावण्यात येतील असे फलक लावलेले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हा राजकीय डाव म्हणून त्याला उत्तर देणे योग्य नाही. म्हणून पक्षाने आपल्या शेतकरी बांधवांना साथ देवून शासनास बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की, भूमीहीनांना गायरानातील पडीक जमीन आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाकरिता करु द्यावी.
शासनाने जर येत्या 10 दिवसात शेतकरी बांधवांना पेरणी करण्यासाठी नव्याने आदेश देवून त्यांचे गावगुंडांपासून त्यांचे व त्यांच्या परिवाराचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांवर कोणत्याही प्रकारे अन्याय सहन केला जाणार नाही, अशी विनंती वजा इशारा बहुजन समाज पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष रमेश इंगळे यांनी दिला आहे.
निवेदन देण्याकरिता बहुजन समाज पार्टीचे सचिव विजय येलकर, जिल्हा प्रभारी डॉ. धनंजय नालट, जिल्ह्याचे विधी सल्लागार व बार असोसिएशन अकोलाचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत वानखडे, अॅड. अहमद बेनीवाले, अॅड. असद खान, बरकतभाई अली, प्रविण गोपनारायण, सचिव विरेंद्र शिरसाट, वासुदेव सराटे, सुरेश सावळे, आनंद तायडे, सुर्यभान तायडे, रामराव तायडे, कमलाबाई इंगळे, अन्नपूर्णाबाई ननीर, बेबी तेलगोटे, रामभाऊ तायडे, भिमराव तायडे, प्रेमदास डोंगरे, शरद खांडेकर,राहुल जामनिक, अजाबराव किर्तक, एकनाथ बाभुळकर, सुदाम सहारे, मारोती देवघडे, धोंडूजी बोंद्रे, अशोक मेश्राम, आत्माराम कांबळष, हरिदास मानकर आदींसह जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने यावर लक्ष दिले नाही तर पुढील काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शेतकरी आपल्या मुलाबाळासहीत भव्य मोर्चा काढू असा इशारा जिल्हाध्यक्ष रमेश इंगळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....