गडचिरोली,(जिमाका) दि.09 : दिनांक 12.03.2022 अन्वये छत्तीसगढ राज्य मधील 73-खैरागढ विधानसभा पोट निवडणूक 2022 चा कार्यक्रम घोषित केला असून दिनांक 12 एप्रिल, 2022रोजी सदर पोट निवडणूकीचे मतदान होणार आहे.
निवडणूकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी आस्थापना मंडळ, कारखाने, दुकाने, औद्यागिक उपक्रम इत्यादी ठिकाणी काम करणारे मतदारांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 नियम 135 (बी) नुसार सुट्टी जाहीर करण्याची तरतूद आहे.संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली मा. भारत निवडणूकआयोग यांचे पत्र दिनांक 12.03.2022 अन्वये छत्तीसगढ राज्य मधील 73-खैरागढ विधानसभा पोट निवडणूक 2022 कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आस्थापना मंडळ, कारखाने, दुकाने, औद्यागिक उपक्रम इत्यादी ठिकाणी कामकरणारे 73-खैरागढ विधानसभा मतदार संघातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याकरीता दिनांक 12 एप्रिल, 2022 (मंगळवार) रोजी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 नियम 135 (बी) नुसार त्यांना पगारी सुट्टी जाहीर करीत आहे.
असे संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.