कारंजा : जागतिक शांतता प्रस्थापित करण्याकरीता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय निःस्वार्थ सेवा कार्य करीत आहे . अकोला येथील ब्रह्मकुमारी रुक्मिणी दीदी यांनी आपल्या जीवनाचे पन्नास वर्ष ईश्वरी कार्यासाठी दिल्याबद्दल त्यांचे गोल्डन ज्युबली (सुवर्ण जयंती वर्ष )व त्यांच्यासोबत अकरा ब्रह्मकुमारी ज्यांनी आपल्या जीवनाचे 25 वर्ष पूर्ण निष्काम सेवा देऊन तन-मन धनाने सेवा वृत्तीने काम केले त्या सर्वांचा नुकताच मलकापूर येथे सन्मान सोहळा घेण्यात आला . या सिल्वर जुबली सन्मान सोहळ्यात सन्मान करण्यात आलेल्या भगीनी मध्ये प्रामुख्याने सुमन दीदी अकोला, शकुंतला दीदी खामगाव, प्रमिला दीदी तेल्हारा ,वैशाली दीदी अकोला, सारिका दीदी मंगरूळपीर, ज्योती दीदी रिसोड ,दुर्गा दीदी अंजनगाव, अर्चना दीदी मलकापूर, लीना दीदी पातुर, जया दीदी अकोट, स्नेहलता दीदी मालेगाव इ . भगीनींचा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच लाईट हाऊस मलकापूर येथे मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला . हा दिव्य भव्य राजेशाही सोहळा पाहून आनंदाने डोळ्याच्या पापण्या ओल्या झाल्याचे दिसून आले .
"कर्म एक बीज़ है,
जिसका परिणाम वक्त पर ही निर्भर होता है ।" निष्काम कर्म, संस्कृति की सेवा, भगवान का सिमरन और एकांत में आत्मविचार करके आत्मा के आनन्द में आने वाला महान हो जाता है। या सोहळ्याला अकोला वाशिम जिल्ह्यातील सर्व केंद्राच्या ब्रह्मकुमारी व मुख्य सेवाधारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्यांच्या या कृतज्ञता सोहळ्याला अकोला जिल्ह्यातील ईश्वरी विश्वविद्यालयासी जुळलेले अनेक मान्यवर तसेच सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे माजी महापौर हरीश अलीमचंदानी , माजी उपमहापौर, नगरसेवक विनोद मापारी, खडकीच्या नगरसेविका शारदा वैकुंठा ढोरे, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, ब्रह्मकुमार नरेंद्र फुंडकर, ब्रह्मकुमार प्रवीण भाई शिरपूर आदी,गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने या गोल्डन जुबली व सिल्वर जुबली कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी सेवाव्रती राजयोगीनी ब्रम्हाकुमारी देवींचा सन्मान केला . कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष ,युवक, युवती यांची गर्दी जमली होती. कार्यक्रमाचा शेवट ब्रह्म भोजनाने झाला. असे वृत्त ब्रम्हकुमार प्रदिपभाई वानखडे यांनी त्यांना मिळालेल्या माहिती वरून महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिले आहे.