देसाईगंज तालुक्यातील शंकरपुर ग्राम पंचायत व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन सप्ताह साजरा करण्यात आला यामध्ये शिवार फेरी, मृदा व जलसंधारण कामाचे नकाशे माती परीक्षण नमुने गाव हवामान अनुकूल आखडा मसुदा तयार करणे ग्राम सभा व प्रकल्प कृती आराखडा कृषी विषयक प्रभात फेरी शालेय विद्यार्थी,शिक्षक मुखयाध्यापक शाळा व्यवस्थापन समिती ग्राम कृषी विकास समिती आणि उमेद प्रकल्पातील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाजी वालदे ग्रा. पं. सरपंच, मार्गदर्शक रुपेश कांबळे तालुका कृषी अधिकारी यांनी केले तर भूषण देशमुख ,कु.कल्पना ठाकरे , कु. एम. बी. कोटांगले , पौर्णिमा प्रधान, दुर्गा कोडापे,राहुल तुळसकर , खोब्रागडे प्रवीण राहाटे, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलान उमाकांत बोधे तर आभार विजया औरासे यांनी मानले यशस्वितेसाठी उमेदच्या महिलांनी व गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले.