कारंजा (लाड) : कारंजा येथील हाडाचे समाजसेवी असलेल्या श्री भारत शेषराव हांडगे यांचे चिरंजीव असलेल्या वेदांत भारत हांडगे या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या शालांत परिक्षेत सुयश मिळवीत 91.80 % गुण मिळवीले आहेत. त्याबद्दल त्याचेवर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वेदांत हांडगे हा आर्थिक परिस्थितीने सर्वसामान्य असलेल्या कुटुंबातील असून तो कारंजा येथील शिक्षण क्षेत्रातील नामांकित असलेल्या जे.सी.चवरे हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज कारंजाचा विद्यार्थी असून, खरोखरीच त्याने परिश्रमातून फलप्राप्ती केली आहे.आपल्या यशाचे सर्वस्वी श्रेय त्याने, प्राचार्य नांदगावकर सर,सर्वच शिक्षक वृंद,आई सौ लिना हांडगे,वडिल भारत हांडगे यांना दिले आहे. त्याचे वडील संत गाडगेबाबा विचारमंच बहु. संस्थेचे पदाधिकारी असून या संस्थेद्वारे ते व त्यांची मित्रमंडळी तालुक्यात विविध मानवसेवी सेवाभावी उपक्रम राबवित असतात.विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, करंजमहात्म्य परिवार, संत गाडगेबाबा विचारमंच बहु संस्था कारंजा इ नी वेदांत हांडगे याचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.