ब्रह्मपुरी तालुक्यात नेहमी अवैध वाळूची वाहतूक होत असते मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील महसूल विभाग जाणीवपूर्वक आर्थिक लाभातून या अवैध वाळू वाहतूक करणार्यांना रेतीघाट मालकाकडून व अवैध रित्या ट्रक मालकाशी संगणमत करून जानिपूर्वक मोकळे दिले जाते तर दिवस व रात्री पिंपळगाव अ-हेर नवरगाव पिंपळगाव भोसले हळदा आवरी या घाटावरून आता कोणतीही कारवाई होत नसल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडला आहे त्याचे काय.? याबाबत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच लोकांनी निवेदन दिल्यानंतर या निवेदनाला केराची टोपली दाखवल्या जातो मात्र या अधिकाऱ्यांना शासनाची गाडी शासनाचा घर शासनाचा पगार दिल्या जातो.तरीसुद्धा शासनाच्या पगारावर समाधानी दिसत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. एक सर्वसाधारण व्यक्ती दिवसाला तीनशे रुपये कमावणारा मजूर समाधानी राहते मात्र पन्नास-साठ हजार महिना मिळणारे शासकीय अधिकारी सरकारी नोकरीवर समाधानी का नाही.?