बल्लारपूर: येथील दादाभाई नौरोजी वॉर्डात उच्चशिक्षित शिवानी अजय बोधनवार या तरुणीने शुक्रवारी रात्री आपल्या मावसकाकाची ब्लेडने गळा कापून हत्या केली. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
घटनेनंतर शिवानीने गुन्हा कबूल केला होता. मात्र एकटी तरुणी हा हत्याकांड घडवून आणणे शक्य नाही, अशी शंका पोलिसांना होती. आरोपीची कसून चौकशी केली असता त्यात शिवानीने हा हत्याकांड मित्राच्या मदतीने घडवून आणल्याचे कबूल केले
व यात आरोपीचा मित्र राघव झा (२३) रा. पडोली व त्याच्याचकडे कामाला असलेल्या वाहनचालक रामकृष्ण तिवारी (२३) (रा. मूळचा उत्तर प्रदेश) याला पडोली येथून शनिवारी रात्री अटक करण्यात आली.