वाशिम : संपूर्ण भारतिय मातृशक्ति उपासकांचे शक्तिस्थळ असलेल्या, कारंजा शहराचे संस्थापक करंजऋषी यांच्या काळातील आणि हिदंवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवरायांनी कुलस्वामिनी मानलेल्या, जागृत अशा श्री कामाक्षा माता संस्थान, कारंजा [लाड] जि. वाशिम,येथील श्री कामाक्षा मातेच्या श्री नवरात्रोत्सवा निमित्ताने, श्री कामाक्षा मातेचे गोंधळी, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त व्यसनमुक्ती सम्राट संजय महाराज कडोळे हे दरवर्षी जय भवानी जय मल्हार नवरात्रोत्सव मंडळा कडून नवनविन उपक्रम राबवीत असतात . आजपर्यंत त्यांनी श्री कामाक्षा चालिसा, श्री कामाक्षा देवी स्तोत्र, श्री कामाक्षा चरित्र, आरती संग्रह इत्यादी स्वतः लिहून पुस्तकांचे अनेकवेळा प्रकाशन केलेले आहे .
सन 2022 च्या श्री कामाक्षा देवी नवरात्रोत्सवा निमित्त त्यांनी भाविक मंडळींच्या मागणी वरून, श्री कामाक्षा देवीचे कॅलेंडर आणि आरत्यांचा सुंदर असा साप्ता.करंजमहात्म्य विशेषांक प्रसिद्ध केला असून सदर्हु कॅलेंडर आणि विशेषांकाचे प्रकाशन, घटस्थापना,सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी, सकाळी १० : ०० वाजता,श्री शिवाजी हायस्कूल वाशिम येथे होणार असून सदरहु कार्यक्रमाचे उद्घाटक अमरावती विधानपरिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार एड किरणराव सरनाईक, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज राऊत वाशिम, आदर्श शिक्षक रामेश्वर पचांगे गुरुजी, सौ अर्चनाताई पचांगे वाशिम, माजी सरपंच प्रदिप वानखडे, गुरुदेव सेवा मंडळाचे हभप लोमेश पाटील चौधरी मानोरा, वैदर्भिय नाथ समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार कारंजा, अ भा नाटय परिषद मुंबई नियामक मंडळाचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर कारंजा यांचे हस्ते होणार असल्याचे, कार्यक्रमाचे आयोजक संजय म.कडोळे, रोहित महाजन, विजय पाटील खंडार, मोहम्मद मुन्निवाले, उमेश अनासाने,दामोदर जोंधळेकर यांनी कळविले आहे .