वरोरा :- वरोरा तालुक्यात सर्वत्र नदी घाटावर , नाल्यावर रेती तस्करांकडून अवैध रेतीची उचल वाहतूक रोजरासपने रात्रंदिवस सुरू आहे. या रेती तस्करांवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे, महसूल विभागाचे तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने प्रशासनाचे अधिकारी मौनी बाबा झाल्याचे दिसत आहे. तालुक्यापासून सहा ते सात कि.मी. अंतर असलेल्या करंजी या गावातुन वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात लाखो ब्रास रेती साचलेली आहे या साचलेल्या रेतीवर लाखो रुपयाचा महसूल हे रेती तस्कर लूटत असल्याने या नदीत मोठमोठाले खड्डे निर्माण झाले आहेत. यावर अंकुश लावण्यास पोलीस प्रशासन,तहसीलदार असमर्थ ठरीत आहे. एवढेच नव्हे तर या रेती तस्करांनी लाखो ब्रास रेतीगिळंकृत केल्याने रेती तस्कर मस्तावलेले आहे. रेती तस्करांकडून वनविभागाच्या तिखटाला ही देणगी देण्यात आल्याची ही अधीकृत माहिती आहे. कारण नदी घटाच्या परिसरातील काही भाग हा वनविभागाच्या अखत्यारीत येत असतो. काही दिवसा आधी खूप जोर लावून पोलीस प्रशासनाने ही आठ ते दहा ट्रॅक्टरां वर कारवाई केली. ही कारवाई मात्र चाल ढकल असल्याची चर्चा नागरिकात, सर्वत्र प्रसार माध्यम ग्रुप वर पाहायला मिळत आहे. एरवी काही ट्रक चालक मालक यांचा गाड्यांवर कारवाई करतानी तहसील विभाग, RTO विभाग यांना लेखी पत्राकाद्वारे कळविण्यात येऊन या गाड्यांवर ओव्हरलोड ची, महसूल विभागाची मोठी कारवाई करण्यात पोलीस अधिकारी महत्वाची आपली भूमिका मांडताना दिसतात. परंतु आता या रेती चालक ट्रॅक्टर वर अशा प्रकारे ठोस कारवाई करण्यात न आल्याने संपूर्ण प्रशासनच मौनी बाबा झाल्याचे दिसून येते आहे.