कारंजा: स्वातंत्र्य काळापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या, महाराष्ट्रातील तमाम संघटनांसोबतच, कारंजा येथील दिव्यांग संघटना सुद्धा सातत्याने, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी करीतच होत्या. परंतु त्या मागणीला खरं बळं मिळालं ते प्रहार दिव्यांग संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या माजी मंत्री तथा आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या प्रयत्नाने. आमदार बच्चुभाऊ कडू सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणीस यांना ठासून सांगत होते.
"सत्तेचा आम्हाला मोह नाही. मला मंत्रीपद मिळाले नाही तरीही चालेल. परंतु माझ्या दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्काकरीता स्वतःच्या समस्या सोडविणारे, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय झालेच पाहीजे.
व अखेर आ. बच्चुभाऊ कडू यांच्या मागणीला मंजूरी देऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांनी खऱ्या अर्थाने दिव्यांगाना स्वातंत्र्य आणि न्याय दिला असल्याबद्दल, सर्वच दिव्यांगांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून, आ बच्चुभाऊ कडू यांचे आभारपूर्वक अभिनंदन करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी कारंजा येथील महाराष्ट्र दिव्यांग संस्थेच्या वतिने तालुकाध्यक्ष ब्रम्हानंद पाटील बांडे यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र शासन पुररस्कार प्राप्त कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष संजय कडोळे,प्रमुख अतिथी हभप चित्रा महाराज वाकडे मोहगव्हाण, हभप धनराज महाराज जाधव लोहारा, इंद्रजित देवरणकर, श्रीमती मिनाताई लुटे, सौ ऐतनगरकर (फुलारी) या सर्व दिव्यांगाच्या उपस्थितीत आणि विशेष अतिथी माजी सरपंच प्रदिप वानखडे, रामबकस डेंडूळे, शेषराव पाटील इंगोले, नितीन वाणी, किरण क्षार, आरिफ पोपटे, मोहम्मद मुन्निवाले, विनोद गणविर, यांच्या उपस्थितीत,

बॅन्डबाजाच्या गजरात, फटाक्याचे आतिश बाजीत, एकमेकांना बुंदीचे लाडू भरवित भव्य व दिव्य असा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. व शासनाचे आणि प्रामुख्याने आ . बच्चुभाऊ कडू यांचे जाहिरपणे आभार मानण्यात आले. शिवाय "बच्चुभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है"दिव्यांगांचा विजय असो ." अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्यात. यावेळी दिव्यांगाना मदत करणारे कारंजा येथील सामाजिक कार्यकर्ते, रोमिलसेठ लाठीया, इम्तियाज लुलानिया, डॉ. ज्ञानेश्वर गरड, शरद काळे, अॅड संदेश जिंतुरकर, राजिक शेख यांचा सत्कार समारंभ सुद्धा घेण्यात आला . याप्रसंगी बोलतांना दिव्यांगांचे नेते,संजय कडोळे म्हणाले "स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय ही आमच्या करीता चांगली उपलब्धी असून आमदार बच्चुभाऊ कडू यांचे प्रयत्नाने आज शासनाने "स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय" मंजूर केले.
त्यामुळे आजचा दिवस आमच्या करीता खऱ्या अर्थाने दिवाळी आनंदाचा दिवस आहे." तसेच अध्यक्षपदावरून बोलतांना ब्रम्हानंद पाटील बांडे यांनी सुद्धा बच्चुभाउचे व शासनाचे आभार मानले व विशेष करून कारंजा तहसिलचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी, तालुक्यातील सर्व दिव्यांगाना पिवळ्या शिधा पत्रिका व दरमहा वेळेवर अनुदान उपलब्ध करून देत असला बद्दल त्यांचेही आभार मानले. कार्यक्रमा करिता नंदू फुलारी, शेषराव इंगोले, उमेश अनासाने, कैलास हांडे , माणिकराव हांडे, मोहम्मद दाऊद मुन्निवाले, रहिमभाई इ उपस्थित होते .कार्यक्रमाला पत्रकार मंडळी आणि नागरिकाचे विशेष सहाय्य मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन संजय कडोळे, ब्रम्हानंद बांडे यांनी, सुत्रसंचालन देवरणकर गुरुजी तर आभार प्रदर्शन धनराज महाराज जाधव या दिव्यांगांनी केले होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....