वाशिम : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना दि. १२ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी यांचेमार्फत मृग व आंबिया बहारामध्ये अधिसुचित फळपिकांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी जिल्हयात राबविण्यात येत आहे. मृग बहार सन २०२५ मध्ये संत्रा, डाळिंब, सिताफळ, व लिंबू या ४ फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये आंबा,डाळिंब, संत्रा, व पपई या ४ फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
दि. ११ एप्रिल, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच दि. १५ मे, २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सुचनांनुसार कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दि. १५/०४/२०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. तद्नुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये सदर योजनेत सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तात्काळ काढुन घेणेबाबत आरिफ शाह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाशिम यांना आवाहन केले..