कारंजा : क्रीडा व युवकसेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडा परिषद ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे दि.६ सप्टेंबररोजी पार पडलेल्या
शालेय जिल्हास्तरीय स्क्वेश क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये झील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला आहे. यामध्ये १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये व साई गाडगे, मानव रामटेके, प्रज्वल माहुरे मुलीमध्ये अर्पिता वाघमारे,वैभवी आंबटपुरे, लावण्या काळे तर 17 वर्ष वयोगट मुलांमध्ये निखिल सुपलकर,शिवराज राठोड, आदित्य खंडेराव, स्वयंम सोनटक्के मुलींमध्ये माही भगत, अनुष्का तायडे, उन्नती बनसोड आणि 19 वर्षाआतील वयोगट मुलांमध्ये सुगत तायडे, रवीसिंग राठोड,प्रज्वल प्रगने व शेख कैस तर मुलींमध्ये निधी सुपरकर,वैष्णवी गवळी व आरुषी कोळकर या सर्व खेळाडूंनी जिल्हास्तरावर विजय मिळवून हे विद्यार्थी विभागस्तरीय स्क्वेश स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक पराग गुल्हाने सर यांचे झील इंटरनॅशनल स्कूलच्या सचिव चेतना मेश्राम मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन केले.