ब्रम्हपुरी:-
अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करून देऊन त्यांना प्रत्येक वेळी संधी देणे व व्यासपीठ उपलब्ध करून देणे व सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रोत्साहन देणे हेच प्रत्येक शाळा आणि कॉलेज यांचे कर्तव्य आहे असे मौलिक विचार प्रा प्रकाश बगमारे ,संस्थापक अध्यक्ष, डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट ब्रम्हपुरी येथील आयोजित सत्र २०२२-२३ मधील शालेय पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मनोगत व्यक्त केले
माता सरस्वती व शिक्षण महर्षी ,कृषी क्रांतीचे प्रणेते माजी कृषिमंत्री भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून शैक्षणिक सत्रमधील घेण्यात आलेल्या राखी मेकिंग,दहीहंडी,फूड मेला, राधा कृष्ण काम्पीटीषण,फॅशन शो,बटाटा रेस,कब्बडी,खोखो,स्लो सायाकलिंग,रनिंग,संगीत खुर्ची,फ्राग जंप, स्पीच स्पर्धा,रांगोळी,दिया मेकिंग,चमचा गोळी व अन्य खेळ व स्पर्धा यातील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी यांना प्रथम,द्वितीय,तृतीय आणि प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले
एकूण विद्यार्थी संखेपैकी जवळपास ९० टक्के विद्यार्थी सहभागी झाले त्यांना आपल्या प्रयत्नात वाढ करावी व योग्य वाटचाल करावी यासाठी शुभेच्या देण्यात आल्या व यासाठी शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे व संस्थेने भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यावे व विद्यार्थी यांनी संधीचे सोने करावे अशी भावना प्रा प्रकाश बगमारे यांनी व्यक्त केली
विविध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्या मनीषा बगमारे यांचे मार्गदर्शनाखाली नीलिमा गुज्जेवार,निशा मेश्राम, प्रगती शेंडे, योगिता बोकडे,वैशाली कुंभारे,पिंकी ठाकरे,नीलम शेडमाके,रंजना कोहळे,वर्षा काटेखाये, मेघा राऊत,संजय नागोसे,लाला बगमारे,श्रीधर ठाकरे,घर्षणा सेलोकर,देवकण्या रुईकर यांनी विशेष परिश्रम घेतले
या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा प्राचार्या मनीषा बगमारे यांनी मार्गदर्शन केले व संस्था सदस्य शांतनू बगमारे यांनी पुढील सत्रात अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे पालकांना आश्वासन दिले
पुरस्कार वितरण सोहळा चे संचालन प्रगती शेंडे यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार नीलिमा गुज्जेवार यांनी मानले
आपल्या प्रतिक्रिया द्या....