सकाळी 10 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बामणी येथे झालेल्या भिषण अपघातात 35 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असुन नजीकच्या दहेली येथील अजय वागदरकर ह्या युवकाला भरधाव वेगाने येणाऱ्या कॅप्सूल ट्रक ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
सदर युवक का वैयक्तिक कामानिमित्त बल्लारपूर कडे येत असताना हा अपघात घडला असुन त्याचे जागीच निधन झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कॅप्सूल ट्रक ला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे