कारंजा- (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)स्थानिक पंचायत समिती येथील सभागृहात दिनांक 20 जून रोजी सकाळी 11 वाजता तालुक्यातील इयत्ता दहावी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने तर तज्ञ मार्गदर्शन म्हणून अजय मोटघरे व विजय भड तसेच प्रमुख अतिथी म्हणून आर एल कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका बी व्ही खेमवानी,वसंत विद्यालय पोहा येथील मुख्याध्यापक मधुकरराव इंगळे,कृष्णप्रभा विद्यालय खेड्याचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम म्हातारमारे व विषय तज्ञ रजनीताई चारथळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे प्रस्तावित समुपदेशन कार्यशाळेचे महत्व विषय तज्ञ रजनीताई चारथळ यांनी विषद केले.अविरत प्रशिक्षणाचे मास्टर ट्रेनर अजय मोटघरे व विजय भड यांनी इयत्ता दहावी मध्ये अनुत्तीर्ण झालेले झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकरीता अकरावी प्रवेश प्रक्रिया, जुलै 2023 मध्ये होणारी पुरवणी परीक्षा, विषयाचे गट, बोर्ड मार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती, दहावी मध्ये मागे राहिलेले विद्यार्थी पुढील आयुष्यात कशी प्रगती करतात, याबाबतचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी इयत्ता दहावी मध्ये मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मदत शिक्षण विभागा मार्फत केली जाईल,असे आश्वासन दिले. इयत्ता दहावी करिता आयोजित केलेल्या समुपदेशन कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन पुरुषोत्तम म्हातारमारे यांनी केले. या समुपदेशन कार्यशाळेला तालुक्यातील इयत्ता दहावी मध्ये मागे राहिलेले किंवा अनुतीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित असल्याचे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.