अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविले जात आहे.दिव्यांग सोशल फाउंडेशन हि राष्ट्रीयकृत एनजीओ असून *संस्थेला समाज कल्याण विभाग अकोला चा आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त आहे.संस्था दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविते, त्याबाबत 15 ऑगस्ट 2022 रोजी अखिल भारतीय मारवाडी युवा मंच शाखा अकोला तर्फे संस्थेला कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.* खंडेलवाल भवन येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यातील ॲड.मोतीसिंग मोहता,डॉ.रणजीत पाटील, बबनराव चौधरी,निकेश गुप्ता, सिद्धेश मुरारका ,नमन खंडेलवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यावेळी दिव्यांग सोशल फाउंडेशन चे प्रा.विशाल कोरडे, डॉ.संजय तिडके, अनामिका देशपांडे, स्मिता अग्रवाल,पूजा गूंटिवार , तृप्ती भाटिया, योगेश शांडिल्य उपस्थित होते.