कारंजा : दिवाळीपर्यंत सुरु असणारी,कारंजा येथील रस्त्याची कामे संबधित कॉन्ट्रॅक्टर कडून बंद ठेवण्यात आलेली असल्याने, छत्रपती शिवराय पुतळा नेहरू चौक,टिळक चौक,अमर चौक, दत्त मंदिर चौक येथून अॅटो रिक्षा सारख्या प्रवाशी वाहनापासून तर इतरही वाहन धारकांना या रस्त्याने आपली वाहने वळवीता येत नाही.शिवाय अनेक ठिकाणी नाल्याचे बांधकामही अद्यापर्यंत झालेले नाही.तरी स्थानिक नगर पालिकेने संबधित कॉन्ट्रॅक्टर कडून उर्वरीत बाकी असलेली कामे लवकरात लवकर उरकून घेऊन कारंजेकरांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्याची मागणी होत आहे .