कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालया तर्फे घेण्यात येणारी एलिमेंटरी व इंटरमीजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा 2023-24 मध्ये बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे 57 पैकी 46 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
बाबासाहेब धाबेकर विद्यालयातून दरवर्षी एलिमेंटरी व इंटरमीजिएट परीक्षेत सहभाग घेतात. या वर्षी विद्यालयातून एलिमेंटरी परिक्षेला 22 तर इंटरमीजिएट परिक्षेला 35 असे एकूण 57 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी एलिमेंटरी परीक्षेत 22 पैकी 18 तर इंटरमीजिएट परिक्षेत 35 पैकी 28 विद्यार्थी असे एकूण 46 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
या मध्ये इयत्ता 10 विचे आचल आमले,प्राची आडोळे,वेदिका करडे,आरती बोनके, जानवी पारे,नम्रता वाजे, आचल दिहाडे, गायत्री ठाकरे,मुक्ता कापसे, अमृता बोनके, गौरी पाटिल,सृष्टि करड़े, प्रशिका मानवटकर, कुणाल इंगोले, विश्वास इंगोले हे 15 विद्यार्थी असे आहे की, ज्यानी दोन्ही परीक्षा उतीर्ण केल्यात त्यामुळे त्यांना येत्या दहावीच्या बोर्ड परिक्षेत जादा 3 गुण मिळणार आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, कलाशिक्षक शालिनी ओलिकवर व राजेश शेंडेकर यांना दिले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याद्यापक विजय भड यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.शाळेचे अध्यक्ष योगेश खोपे व सचिव वामनराव घोडे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्यात. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांचेकडून मिळाल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.