कारंजा (लाड) : वाशिम जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय ठेवणाऱ्या आणि तळागाळातील ग्रामस्थ,शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या,जिल्ह्याचे सुपूत्र असलेल्या कार्यतत्पर,हजरजवाबी,विकास योद्धा अमोल पाटणकर यांची भाजपा आणि उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस यांनी राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेत तरी वर्णी लावली पाहिजे.अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड) वाशिमचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केली आहे.उल्लेखनिय म्हणजे कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातील श्रीक्षेत्र कोंडोली येथील मुळ रहीवाशी व त्यामुळे जिल्ह्याचे सुपूत्र असलेले अमोलजी पाटणकर हे उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस यांचे अव्वल सचिव असून त्यांचे सामाजिक कार्य दांडगे आहे.आजतागायत विकासापासून कोसो दूर असलेल्या वाशिम जिल्ह्याचा विकास होऊन जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या जास्तित जास्त संधी कशा उपलब्ध होतील याकडे त्यांचे लक्ष्य लागलेले आहे. त्यामुळे जिल्हयाच्या विकासाकरीता ते धडपडत असतात.त्यांच्याकडे आपल्या समस्या व अडचणी घेऊन गेलेली व्यक्ती रित्या हाताने केव्हाच परत जात नाही.प्रत्येकांच्या अडचणींवर मार्ग शोधून त्यांना ते आनंदी व समाधानी करतात. त्यामुळे खरे तर अशा अष्टपैलू नेतृत्वाची राज्यसभा-विधान परिषदेसारख्या सदनात व पुढे मंत्रीमंडळात गरज आहे.त्यांच्या रुपाने भाजपाला एक सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि कार्यदक्ष व मनमिळावू नेतृत्व मिळू शकते. त्यामुळे आता वेळ आलेली आहे. उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांनी त्यांची निवड राज्यसभेत किंवा विधान परिषदेवर करावी.किंवा निदान विदर्भ वैधानिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून तरी करावी.जेणेकरून वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याला सक्षम असे नेतृत्व मिळू शकेल.अशा आपल्या भावना विदर्भ लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे,उमेश अनासाने,प्रदिप वानखडे,मंगरुळपिरचे राजाराम पाटील राऊत,लक्ष्मणराव इंगळे, मानोऱ्याचे लोमेश पाटील चौधरी, गजाननराव घुबडे,वाशिमचे शेषराव मेश्राम आदी लोककलावंतानी व्यक्त केल्या आहेत.