राज्य परिवहन महामंडळ, ब्रम्हपुरी आगारातील बसेसच्या फेऱ्या ज्या मार्गावर सुरू आहेत. त्या मार्गावरील विद्युत खांब हा रोडच्या बाजूला झुकलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वायरचा एस.टी. बसला स्पर्श होऊ शकतो. अशा परिस्थितीत एस. टी. बसला अपघात झाल्यास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. करीता भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरीता झुकलेल्या विद्युत खांबाची दुरूस्ती करून इलेक्ट्रिक वायरचा स्पर्श एसटी बसला होणार नाही, यासाठी त्वरीत उपाययोजना करावी. बसला अपघात झाल्यास व विद्यार्थ्यांच्या जिवीतास हानी पोहचल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची राहिल, त्यामुळे झुकलेले विद्युत खांब दुरुस्त करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. कार्यालय ब्रम्हपुरी व उपविभागीय अधिकारी राजस्व उपविभागीय कार्यालय ब्रह्मपुरी यांच्याकडे केली.
त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत उपविभागीय अधिकारी राजस्व उपविभागीय कार्यालय ब्रह्मपुरी यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. कार्यालय ब्रम्हपुरी यांना त्वरित झुकलेल्या विद्युत खांबाची दुरूस्ती करून देण्याचे आदेश दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी पुढाकार घेतल्यामुळे झुकलेल्या विद्युत खांबाची दुरूस्ती करण्यात आली. त्यांच्या मागणीला यश आले. त्यांच्या या कार्याबद्दल एस. टी. बस ने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.