अकोला:- पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील महिलेने फायनान्स कंपनीच्या तगाद्याला वैतागून आत्महत्या केली होती. या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सोयगाव येथील फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक व वसूली अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पिडीत कुटुंबाला तात्काळ न्याय देण्यात यावा. अशी मागणी निवेदनाव्दारे मराठा सेवक टिमच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी हरिभाऊ पाटील, रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, यशोदिप पाटील, राकेश सोनवणे, गणेश पाटील उपस्थित होते.
कोल्हे येथील शरद पुंडलिक पाटील यांनी गरजेपोटी सोयगाव तालुक्यातील क्रेडिट ऐक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीकडून त्यांच्या पत्नी सविता यांच्या नावावर कर्ज घेतले होते. या कर्जाची रक्कम थकीत झाल्यानंतर फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात होता. त्यामुळे पत्नीने आत्महत्या केली. असे निवेदनात म्हटले आहे.