कारंजा : दि. 06/06/2024 गुरुवार रोजी अमरावती विभाग स्तरीय विज्ञान अध्यापक मंडळ सहविचार सभा शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्य) जि .प .अकोला येथे दुपारी 3 वाजता संपन्न झाली.
सभेमध्ये Inspire अवार्ड, विज्ञान विषयक विविध उपक्रम , वैज्ञानिक अभ्यास दौरा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य. ) जि.प . अकोला , प्रमोद टेकाडे ,जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक जिल्हा परिषद अकोला , प्रा.डॉ.रविंद्र भास्कर अध्यक्ष, अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ, जनकसिंह राजपूत उपाध्यक्ष (बुलढाणा) , विजय भड, सचिव ( वाशिम ), विनायक ताथोड (अमरावती) तसेच अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे प्राचार्य नितीन तिवारी, विश्वास जढाळ, अनिल जोशी , सुरेश किरतकर , मुरलीधर थोरात , सुरेखा माकोडे , ओरा चक्रे, सुनील वावगे , धर्मदिप इंगळे, आशा ताडे, राजेश टिंगणे उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविकात डॉ.प्रा.रवींद्र भास्कर यांनी मागील वर्षी निवड प्राप्त सर्व इन्स्पायर अवॉर्ड मॉडेल बाबत सविस्तर चर्चा केली . मॉडेल कसे असावे? मॉडेलमध्ये काय अपेक्षित आहे ? कोणत्या मुद्द्यावर मॉडेलची निवड होते? मॉडेलच्या नावाची निवड कशी असावी ? कोणत्या मॉडेल ला परीक्षक प्राधान्य देतात यावर उदाहरणासह सविस्तर मार्गदर्शनपर चर्चा केली आणि जास्त संख्येने आणि दर्जात्मक मॉडेल आपल्या जिल्ह्यातून, विभागातून कसे सादर केले जातील यावर आपला सर्वांचा अधिकाधिक भर असला पाहिजे जेणेकरून ते आपले मॉडेल पुढच्या स्तरावर कसे निवडले जाईल अशा पद्धतीने असावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. विज्ञान विषयक उपक्रम तसेच अभ्यास दौऱ्याबाबत प्रस्ताव डॉ. सुचिता पाटेकर यांच्या समोर मांडला. त्यानंतर डॉ. सुचिता पाटेकर मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर चर्चेतून इन्स्पायर अवॉर्ड बाबत सखोल चर्चा करून सर्व शिक्षक मिळून चर्चा करून अधिकाधिक दर्जेदार आणि चांगले मॉडेल सादर करण्याचे आवाहन केले तसेच निवडक उपक्रमशील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात यावी जेणेकरून
मॉडेलची निवड जिल्हा स्तर, विभाग स्तर , राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर निवड होईल . शिक्षकांची कल्पकता, व्यापकता वाढावी तसेच नाविन्यता त्यांच्या अध्यापनातून आली पाहिजेत जेणेकरून त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना होईल याकरिता अभ्यास दौऱ्याचे आपण नियोजन करून आयोजन करू असं त्यांनी सांगितलं. राजस्थान मधील जयपुर , जोधपूर या ठिकाणी अभ्यास दौरा करण्याचे प्राथमिक चर्चेतून ठरले . सर्वांच्या सहकार्याने अभ्यास दौऱ्याचे आयोजन, नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. आणि साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचं नियोजन करण्याचे सर्वांच्या संमतीने ठरले. आभार प्रदर्शन मुरलीधर थोरात यांनी व्यक्त केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....