*जीवनगाडी*
झुक झुक झुक झुक जीवनगाडी
वाईटाचा धूर सोडीत गाडी
पळती दुःखे पाहू या
गुरुकुंज मोझरी जाऊ या !
राष्ट्रसंत समाधी घेता दर्शन
मानवतेची घेऊ या शिकवण
जयगुरु जयगुरु बोलू या
गुरुकुंज मोझरी जाऊ या !
रामनामाचे भरुन इंधन
साफ करु मनाचे मशिन
वाईटाचा मोह सोडू या
गुरुकुंज मोझरी जाऊ या !
जीवनगाडी चालत राही
आयुष्याची चाके फिरत राही
संयमाचा ब्रेक लावू या
गुरुकुंज मोझरी जाऊ या !
संकटाला सामोरे जाता
चांगल्या विचाराचे हॕण्डल धरता
बदलती वळणे पार करु या
गुरुकुंज मोझरी जाऊ या !
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोनः ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....