ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती जगद्गुरु संत तुकाराम महाराज सार्वजनिक वाचनालय कन्नमवार वार्ड क्रमांक 17 येथे श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक दादाजी चापले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माझी प्राचार्य हेमंत रामटेके होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, मुकरू पाटील आभारे, मधुकर डोंगरे, राजू उंदीरवाडे, प्राचार्य मुकुंद म्हशाखेत्री ,घनश्याम जक्कुलवार, प्रफुल येलेकर आदी उपस्थित होते.
यावेळी हेमंत रामटेके यांनी अठरा विश्व दारिद्र्य आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये अडकलेल्या सर्व दीनदलित तसेच शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून त्यांचा उद्धार करणारी खरी समाजसुधारक ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होत्या असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाजी चापले यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून सावित्रीबाईंच्या विचारांची आज नितांत गरज असून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, ध्यास, समर्पणाची भावना आपल्याला कधीच विसरता येणार नाही असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन मारुती दुधबावरे यांनी तर उपस्थितांचे आभार चंद्रकांत शिवणकर यांनी मानले कार्यक्रमाला कन्नमवार वार्डातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.