ब्रम्हपुरी - उड्डाण या शालेय सांस्कृतिक उपक्रमांतर्गत पोदार शिक्षण समूहातर्फे खुली एकलनृत्य स्पर्धा पोद्दार स्कूल तुंमडी मेंढा नागभीड रोड ब्रह्मपुरी येथे दि. 29 मे 22ला सायंकाळी आयोजित करण्यात आली.
एकलनृत्य स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय मॅजिस्ट्रेट संदीप भस्के, प्रमुख अतिथी म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ प्रशांत झोडे, नृत्य- दिग्दर्शिका मनीषा इठावले नागपूर, मुख्याध्यापक प्रीती काळबांदे, प्रवीण ढोले, डॉ. दर्शना उराडे , आवेज शेख इ मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत उत्साहात पार पडलेल्या खुल्या एकल नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता दुसऱ्या वर्गामध्ये शिकत असलेली कु.अक्षयनी युवराज मेश्राम या विद्यार्थीनीने श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
प्रथम क्रमांकाबद्दल अक्षयनीला दोन हजार रुपये रोख , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ऍड. भाष्कर उराडे यांच्या हस्ते नृत्य- दिग्दर्शिका मनीषा इठावले, शाळेचे मुख्याध्यापक, प्रमुख अतिथींच्या उपस्थित गौरविण्यात आले.