वरोरा :- शहराच्या मध्यभागी आंबेडकर चौकात गोठी मेडिकल स्टोअर आहे. या स्टोअर्स मध्ये ड्रायव्हर या पदावर काम करणारा छोटू उर्फ रामू ऋषी घाडगे यांनी मेडिकल ला लागून असलेल्या स्टोर रूम मधील एका महिलेचा विनयभंग करण्यात आला .
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेडिकल मध्ये महिलाही काम करते ती स्टोर रूम मधून काही सामान आणण्याकरिता दिनांक 23 ऑक्टोबर रोज बुधवार ला रात्रौ 8.30 च्या दरम्यान गेली असता तिच्या मागे जाऊन आरोपीने तिचा विनयभंग केला. झालेला प्रकार बघुन तरुणी घाबरून गेली तिने हा प्रकार पोलीस स्टेशन येथे सांगून घटनेची तक्रार दिली पोलिसांनी सदर आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपी छोटू घाडगे यास कलम 74 अंतर्गत अटक केली.
पोलिसांनी आरोपीला सूचना पत्रावर सोडून दिले.
काही महिन्या आधी दोन शिक्षकांची अश्याच प्रकारची घटना एका नामवंत विद्यालयात घडली या घटनेने जनसामान्यत तीव्र पडसाद पडत असून नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. सामाजिक संघटना या प्रकरणात लक्ष घालतील का ?
सदर घटनेचा तपास
पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरकार हे घटनेची चौकशी करीत आहेत.