पदाधिकारी,सभासद आणि हितचिंतक स्नेहीजणांकडून मिळालेल्या सभा पोडीयमचे झाले अनावरण !
अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना सामान्य सभासद आणि विविध क्षेत्रातील उच्चविद्याविभूषित मान्यवरांना सोबत घेऊन राबवित असलेले अनेक सामाजिक उपक्रम गरजूंच्या मदतीसाठी उपयुक्त आहेत.त्याचप्रमाणे सध्याच्या स्व.लतादीदींवरील गीतांसोबतच आयोजित गीत गायनाचे असे कार्यक्रम हे संतुलीत मानसिक स्वास्थातून आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोलाचे उपचारक आहेत.असे प्रतिपादन महा.शासनाच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालिका मा.डॉ.तरंगतुषार वारे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या १७ व्या मासिक विचारमंथन मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी सर्वप्रथम संघटनेच्या सामाजिक कार्याचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक संत गाडगे बाबांना वंदन,हारार्पण व लता मंगेशकरांना अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्ष,प्रमुख अतिथी आणि मान्यवरांचे याप्रसंगी सन्मानपत्र शाल व पुष्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आले.
स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.स्व लता मंगेशकरांचा फोटो स्कूटरच्या स्टेपनीवर लावून फिरणारे ३५ वर्षांपासूनचे त्यांचे परम अनुयायी आर्वीचे शासकीय कंत्राटदार श्री राजीव देशमुख,कंझारेकर व त्यांच्या पत्नी चित्रकार सौ शुभांगी देशमुख हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.राजीवजींनी स्व.लतांजींवर स्वत: लिहिलेल्या "धरतीपर सरस्वती है लतादीदी" या व ईतर गीतांचे, त्याप्रमाणे अथर्व सतिश देशमुख व तन्वी प्रविण देशमुख( वाघ) या बाल कलाकारांच्या बहारदार गीतगायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यावेळी व्यासपीठावर संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख,निंबेकर,जेष्ठ पत्रकार व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पंजाबराव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

पदाधिकारी सभासद आणि हितचिंतक स्नेही जणांच्या आर्थिक सहयोगातून संघटनेसाठी खरेदी केलेल्या सभा पोडीयमचे अनावरण यावेळी करण्यात आले.संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून संघटनेची वाटचाल,पत्रकारांवरील अन्यायविरूध्द उठविलेले आवाज आणि आगामी कोकणदर्शन दौऱ्याच्या नियोजनाची माहिती याप्रसंगी दिली.राजीव देशमुख यांनी गायनापूर्वी स्व.लताजींनी प्रतिकूल परिस्थितीतून केलेल्या कलासाधनेची माहिती दिली.पंजाबराव देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची वास्तविकता विषद करून त्या सोडविण्यासाठी संघटनेची ताकद वाढविण्याचे आवाहन यावेळी केले.या कार्यक्रमाला राजीव देशमुख यांच्या मातोश्री,सेना दलातील निवृत्त सर्वश्री रामराव देशमुख,दिलीप सिंह चव्हाण,सुनिल घोडके,अॕड.नितीन धूत,केंद्रीय पदाधिकारी अॕड राजेश जाधव,डॉ अनुपकुमार राठी,प्रा.डॉ.सुहास उगले,सुरेश तिडके,दिलीप भाऊ बढे,केंद्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख,उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,किशोर मानकर,पुष्पराज गावंडे,,डॉ.शंकरराव सांगळे, अंबादास तल्हार,सिध्देश्वर देशमुख,विजयराव देशमुख,डॉ.अशोक तायडे, प्रा.विजय काटे,अंकूश गंगाखेडकर,संदिप देशमुख,विजयराव बाहकर,पत्रकार दिपक देशपांडे,पंजाबराव वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पत्रकार महासंघाच्या अकोला जिल्हा पदाधिकारी सौ.दिपाली बाहेकर यांच्या संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्री रामराव देशमुख,खामगांव,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, नंदकिशोरजी चौबे,सागर लोडम,मंगेश चऱ्हाटे,प्रा.सुरेश कुलकर्णी,सतिश देशमुख ( निंबेकर)दिलीप नवले,व्यंगचित्रकार शुभम् बांगडे,रविन्द्र देशमुख,संतोष देशमुख,श्याम कुलकर्णी,मनोहर मोहोड,रवि पाटणे,सतिश देशमुख (उगवेकर),सौ.नयना देशमुख,सौ.वैशाली देशमुख,प्रविण वाघ,सुरेश भारती,गौरव देशमुख,विष्णू नकासकर,पंकज देशमुख,मोहन देशमुख,माणिक शेळके,विरेंद्र लाड,आकाश हरणे व बहूसंख्य श्रोते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....