कारंजा (लाड) : तप्त उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या हवामानामध्ये बदल होऊन अचानक पणे कमि जास्त तापमान होत असल्याचा मानवी शरिरावर परिणाम होण्याची शक्यता असून,त्यामुळे विषाणुजन्य आजार डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या केव्हा अचानक प्रखर उन्ह तर केव्हा अचानक गारवा तर केव्हा अवकाळी पाऊस त्यामुळे हवामानात होणाऱ्या चढउताराच्या बदलाने डोकेदुखी,हात पाय अकडणे, ताप येणे,मळमळणे,शौच्यास पातळ होणे.इत्यादी आजाराच्या तक्रारी वाढत असतात.शिवाय ( हिवताप ) मलेरिया,डेंग्यु, अतिसार (डायरिया) न्युमोनिया होण्याचाही संभव असतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आजारावर लक्ष्य केन्द्रित करून, आरोग्य विषयक तक्रार असल्यास किंवा बरे वाटत नसल्यास तात्काळ आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.तसेच डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय स्वतःचे मनाने मेडिकल स्टोर्स वरून गोळ्या औषधे घेऊ नये. असे आव्हान कारंजा येथील माजी वैद्यकीय अधिकारी तथा समर क्लिनीकचे ज्येष्ठ डॉक्टर मुजफ्फरखान यांनी केले आहे.त्याच प्रमाणे पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले,आपल्या आहार विहाराकडे विशेष लक्ष्य द्यावे. वातावरणात बदल जाणवत असल्यास हॉटेलची व उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये.बाजारातील कोल्ड्रिंक्स, अतिथंड पेय,अति गरम अन्न पदार्थ,आंबट,तेलकट,टरबूज, खरबूज,जास्त दिवसाचे आंबे खाऊ नये.साधे हलके अन्न व फळे घ्यावीत.