गोंदिया: डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नैनपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथे ७ ते ८ जुलैच्या रात्री दरम्यान स्कॉर्पिओ एम. एच. ३३, व्ही. १८०९ या गाडीत सुगंधित तंबाखूचे पॅकेट आढळल्यामुळे ते वाहन पोलिसांनी पकडले. ७ प्लास्टिक बोरीमध्ये ७०० पॅकेट तंबाखू व १६ प्लास्टिक पोत्यात प्रत्येक पोत्यात ५० पॅकेट प्रमाणे ८०० पॅकेट तंबाखू असा एकूण २ लाख ४६ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत ८ लाख रुपये असा एकूण १० लाख ४६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक बांबोडे, पोलिस उपनिरीक्षक सरोदे, शिंदे, पोलिस हवालदार झुमनलाल वाढई यांनी केली आहे. या प्रकरणात आरोपी किरण अनिल शहारे (३४) व रवींद्र उर्फ गुड्डु जयदेव देवळे (२४) दोन्ही रा. वॉर्ड क्रमांक ४ आझाद चौक सानगडी ता. साकोली, जि. भंडारा या दोघांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.