अकोला :-
जन्मदात्या आई-वडिलांना न विसरता त्यांची सेवा करणे व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हेच खरे शिक्षण घेतलेले व शिक्षणामध्ये मिळवलेले प्राविण्य व आपल्या गावाला आपल्या परिसराला न विसरता विकासामध्ये योगदान देण्यात आपण या समाजात राहतो त्या समाजाचे रूम करणे परिवाराचा कल्याण करणे ही भावना लक्षात घेऊन सातत्याने यशाची शिडी चढत जावे व आपल्या संसाराला न विसरता संकुचित विचार न ठेवता सामाजिक दायित्व व आपल्या आई-वडिलांनी ज्या कष्टाने आपल्याला शिक्षण मिळवून दिले त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे उद्दिष्ट ठेवून त्यांना न विसरता कार्यरत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात बारावी परीक्षेमध्ये आर्ट सायन्स कॉमर्स या विषयांमध्ये विशेष प्राविण्य 148 विद्यार्थ्यांचा गौरव कौतुक सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने ते होते तर मंचावर खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल किशोर पाटील, प्राध्यापक नितीन बाठे, माधव मानकर सजयगोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड, रमेश अल्करी, पवन महल्ले गिरीश जोशी कृष्णा शर्मा ,वैशाली शेळके, अमोल गीते, गोपाल मुळे, नितेश पाली संदीप गावंडे, नितीन राऊत, एडवोकेट कुणाल शिंदे, किशोर कुचके, भिकाजी धोत्रे, संतोष पांडे जानवी डोंगरे, वेंकट ढोरे, दिलीप मिश्रा आधी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते
स्पर्धेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी न घाबरता समर्थपणे नियोजनबद्ध एकाग्रता ठेवून परिस्थितीचा सामना करावा विजयी आपला आहे असे सांगून ध्येय लक्ष ठेवून कार्य केल्यास यश पदरी पडते यासाठी परिश्रमाची पराग पराकाष्टा करावी लागते त्याची तयारी करावी व आपल्या आई-वडिलांचा पूर्वजांचा आदर सन्मान ठेवून आपल्या परिसराचा नाव उज्वल करा अशा शुभेच्छा आमदार सावरकर यांनी याप्रसंगी दिल्या.
सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांसाठी दालन असून आपल्या आवडीनिवडीनुसार अभ्यासक्रमाचा निवड करून त्यामध्ये यश संपादन करा अडीअडचण आलीस भाजपा पाठीशी उभी आहे असे सांगून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन 33 वर्षाची परंपरा कायम ठेवून भाजपाने सातत्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या कर्तुत्वाचा सुप्त गुणाचा कौतुक करण्यासाठी हा सोहळा असल्याचे खासदार अनुप, धोत्रे यांनी सांगून माजी मंत्री संजय धोत्रे भाऊसाहेब फुंडकर गोवर्धन शर्मा यांची परंपरा कायम असल्याचे सांगितले
कार्यक्रमाची प्रास्ताविक भाजपा प्रसिद्धीप्रमुख माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी तर संचलन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल देशमुख पूर्व पुणे उमेश श्रीवास्तव जितेंद्र देशमुख यशवंत दादले विवेक भरणे विपुल वगैरे चंदन शर्मा रोहित चौरसिया, रंजना विंचनकर, संतोष डोंगरे, विकी ठाकूर, विनोद मापारी विजय इंगळे, आदींनी अथक परिश्रम घेतले
आपल्या प्रतिक्रिया द्या....