अकोला --महात्मा गांधीजीच्या मुलोद्योगी शिक्षण पद्धतीने जीवन शिक्षणाचे धडे दिले. नविन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आजही मुलोद्योगी शिक्षण उपयुक्त असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुहास उदापुरकर यांनी केले .
महात्मा गांधी जयंती निमित गांधी जवाहर बागेत सर्वोदय मंडळाचे वतीने आयोजित सूतकताई यज्ञाचे समारोप प्रसंगी बोलत होते .
सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार , काँग्रेस कमेटी चे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर,महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शि. ना. ठाकुर, श्रीकृष्ण विखे, ह.मो. खटोड गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी ८वाजता पासून जिल्ह्यातील सर्वोदयी कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सूतकताई यज्ञ केला. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते प्रल्हादराव नेमाडे, महेश आढे,डॉ मिलींद निवाणे, अनिल मावळे, नाणे संग्राहक शंकरराव सरप, विठ्ठलराव हिवरे, विजय कौसल, ॲड. विलास वखरे,रोहित तारकस सुभाष पुंडकर, अनुराग मिश्रा, नितीन भरणे, डॉ.गुरचरणसिंह ठाकुर, केशवराव कोठाणे, दिलीप शोभराज साधवाणी, वासुदेवराव काळमेघ गुरुजी, प्रा.डॉ. संजय तिडके, अशोकराव पटोकार, राम मुकुंद शेगोकार, केशवराव कोठ,श्रीमती कमलताई हिवरे, वनिता राऊत, कल्पना हुरपडे, सुरेश भोजने, रवी नेमाडे, प्रा. दतात्रय भाकरे, प्रा. प्रविण वाघमारे, डॉ. रावसाहेब काळे, जयकृष्ण वाकोडे, प्रा सय्यद नहीम सद्भावना मंच,रामेश्वर बरगर, राम मुळे, रहेमान बाबू,सुनिल अवचार, सरदार खान, फय्याज अहमद खान, दीपक आखरे यांचे सह शेकडो कार्यकत्यांनी चरख्यावर सूतकताई केली.
महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे वतीने व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनी लावण्यात आली. शीघ्रकवी तेजराव भिसे, रामराव पाटेखेडे, संतोष वर्गे यांनी महात्मा गांधी व व्यसनमुक्ती वर कविता सादर करून ज्ञानरंजन केले.
ज्येष्ठ पत्रकार डि. ओ. म्हैसने अकोट यांनी सरकार ला दारू मुक्ती करायची असेल तर दारू दुकानाचे परवाने देणे बंद करावे अशी मागणी भाषणातून केली.
मृत पावत चाललेल्या नद्या जीवंत करणे व चरखा उद्योगाला प्राधान्य देणे यासाठी सर्वोदयी कार्यकर्त्यानी पुढाकार घेण्याचे आवाहन ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते प्रल्हादराव नेमाडे यांनी केले.
महात्मा गांधीजींच्या विचारा चा वसा आणि वारसा सर्वोदयी कार्यकर्ते सद्याच्या खडतर परिस्थितीत न डगमगता पुढे नेत आहेत ही बाब सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अशोकराव अमानकर यांनी केले.
गांधी जवाहर बाग एके काळी अकोल्याचे वैभव होते.महात्मा गांधी व पंडीत जवाहरलाल नेहरू यांची चित्रमय प्रदर्शनी होती. आज ती दिसत नाही. महानगरपालिका व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून पुन्हा या बागेला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी केले.
महात्मा गांधी जयंती निमित दिनांक २ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर पर्यत अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ व महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे वतीने जिल्ह्यात व्यसन मुक्ती सप्ताह साजरा करीत असल्याची माहिती सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.मिलींद निवाणे यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल मावळे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....