जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा.ना. प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या चंद्रपूर दौऱ्यां निमित्त चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून जनता दरबार आयोजित केला होता, सदर जनता दरबार मध्ये महानगरपालिका आयुक्त महावितरणचे अधिकारी चंद्रपूर चे तहसीलदार तसेच अन्य अधिकारी यांच्यासमवेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचे नेतूत्वात वन विभागा संदर्भात बिगर आदिवासी शेतकऱ्यांना वन पट्टे देण्यात यावे तसेच ज्यांचे प्रलंबित दावे आहेत त्यांच्या जमीनी खाली करण्यासाठी वारंवार येत आहे त्या शेतकऱ्यांना वारंवार त्रास देऊ नये असे आदेश मंत्री मोहदय यांनी जिल्हाधिकारी व वन अधिकाऱ्यांना दिले तसेच ज्या आदिवासींना वन पट्टे मंजूर केले आहे त्या वन पट्टे धारकांना मोजणीचे रक्कम आदिवासी विभागाने भरून मोजणी करून द्यावी असे सुद्धा आदिवासी विभागाला सांगितले त्या वेळी अंकुश कौरासे , माजी सरपंच साईनाथ परचाके , पांडुरंग पारखी पाटील, आस्वाले पाटील, मारोती पाचभाई, आनंदराव सोनटक्के, उद्धव काळे, ऊत्तम पारखी, देवराव पारखी, मारोती झाडे, काशिनाथ झाडे, राजू धोटे, ताराबाई उईके, वारलू मडावी