वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : दि.२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून अतिरेक्यांचा खात्मा केला.त्यामुळे २९ सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे.भारतीय सैन्यांची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत स्फूतीदायक व्हावी.तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा.यासाठी दि.२९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.
या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने दि. २९ सप्टेंबरला निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात "शौर्यदिन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे होते. विश्वनाथ घुगे यांनी शहिदांच्या स्मृतीचिन्हास पुष्पहार अर्पण केला व शहिदांना सामुहिक अभिवादन केले.
यावेळी भारत-पाकिस्तान युध्दात दि.१२ सप्टेंबर १९६५ रोजी शहिद झालेले शिपाई यशवंत सरकटे यांच्या विरपत्नी श्रीमती शांताबाई सरकटे व जम्मु कश्मिरमध्ये आतंकवादी यांच्या विरुद्धच्या "ऑपरेशन रक्षक" मोहिमेत दि.११ डिसेंबर १९९४ रोजी आर्टिलरी रेजीमेंटचे शहिद झालेले शिपाई दगडु लहाने यांच्या
विरपत्नी श्रीमती पार्वतीबाई लहाने यांचा शाल व श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कल्याण संघटक संजय देशपांडे यांनी केले.यावेळी माजी सैनिक विधवा श्रीमती कोमल नवघरे,श्रीमती सविता इंगळे,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माधवराव शिंदे,सचिव महादेव जव्हादे,आंबेकर,जाधव,डोंगरदिवे,आपटे,अवचार,बाजड, शहीदांच्या आणि माजी सैनिकांच्या वीरपत्नी,माजी सैनिक विधवा यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.