अकोला - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अकोला महानगर कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम महानगराचे अध्यक्ष मो. रफीक सिद्दिकी यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी महानगर अध्यक्ष मो.रफीक सिद्दिकी यांनी मार्गदर्शनात सांगितले की, ज्या माणसाने दीड दिवसाची शाळा शिकून फकीरा नावाची कादंबरी लिहिली ज्याच्यावर महाराष्ट्रातील व भारतातील तीन कोटी लोकांनी पि एच डी केली ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. पायी चालुन रशियाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांचा पोवाडा जर कोणी पोहचवीला असेल तर ते आहेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर कार्याध्यक्ष देवाभाऊ टाले, उपाध्यक्ष पापाचंद्र पवार, एड. संदीप तायडे, अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष वसीम खान, रियाशोद्दीन पहेलवान, महानगर प्रसिद्धीप्रमुख अमन घरडे, अमीत, सलमान भाई, आनंद वैराळे, योगेश हुमणे, निसार खान यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.