वाशिम : चालू आठवड्यात शनिवार-रविवार-सोमवार-मंगळवार असे सतत चार दिवस झालेल्या सततधार पावसाने संपूर्ण विदर्भ मराठवाड्यासह वाशिम जिल्ह्यासह कारंजा-मानोरा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. सततधार पावसाने येथील सर्व नदी नाल्यांना पूर जाऊन येथील धरणं तुडूंब भरली.शेतकऱ्याचे नगदी पिक सोयाबीन फुलावर आणि शेंगा धरण्याला सुरुवात झाली असतांनाच सततच्या धुवॉधार पावसाने घात केला. सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाल्याने,डाबरीतील शेती असणाऱ्या बहुतांश शेतकऱ्याच्या शेतातील पिके हातची गेली. मंगरूळपिर मानोरा तालुक्यातील पिके तर जमिनीसह पावसाने खरडूनच नेली.त्यामुळे शासनाने ह्या भयावह परिस्थितीचा विचार करून,वाशिम जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा.शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून अविलंब सरसकरट नुकसान भरपाई द्यावी.सोयाबीन पिकाला सात हजार रुपये भाव जाहीर करावा. अशी मागणी शेतकरी मित्र असलेले आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ; उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस ; दूसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ; कृषी मंत्री धनंजय मुंढे ; पालकमंत्री संजयजी राठोड यांचेकडे केली आहे.