कारंजा : आयुष्यभर सेवाव्रती जीवन जगत तन मन धनाने समाजाच्या सेवेत तल्लीन असणाऱ्या सेवाव्रती,कारंजा शहराचे पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते तथा झुंजार पत्रकार स्व.गोपाल पाटील भोयर यांचे, शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 08:00 वाजता,अचानक हृदयविकाराने निधन झाले होते.निधना पूर्वीच काही दिवस अगोदर त्यांनी नेत्रदानाचा संकल्प घेतलेला होता.त्यांच्या आकस्मिक निधनाचे प्रचंड दुःख असतांनाही ही गोष्ट त्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका पियुषाताई भोयर यांच्या लक्षात आली.व त्यांनी लगेच माजी प्राचार्य रमेशजी काटोले तथा उमेश भोयर यांच्या पुढाकारातून,आयुष्यभर सेवाव्रती जीवन जगणाऱ्या स्व.गोपाल भोयर यांचे मरणोत्तर नेत्रदान करून,दोन गरजू व्यक्तींना दृष्टी देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार लगेच अमरावती येथील दिशा ग्रुपच्या दिशा इंटरनॅशनल आय बँक या चॅरिटेबल सोसायटीला कळविण्यात आले.लगेच अमरावतीच्या टिमचे हिमांशू बंड, स्पप्निल गावंडे आणि अनिल देशमुख यांनी नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतली.याप्रसंगी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ.पंकज काटोले,डॉ. विजय जवाहरमलाणी,डॉ.शार्दूल डोणगावकर, डॉ अजय कांत,डॉ. नवल सारडा,डॉ.उल्हास काटोले, शेखर बंग, आशिष बंड, श्याम सवाई,प्रज्वल गुलालकरी,नितीन कश्यप,रमेश देशमुख, पियुषाताई भोयर तसेच कुटूंबातील सदस्य इत्यादी हजर होते.उपास्थित दिशा इंटर नॅशनल आय बॅक अमरावती तसेच दिशा ग्रुपच्या सदस्यांनी स्व. गोपाल पाटील भोयर यांना श्रध्दांजली समर्पित केली.आणि कुटूंबीयांचे सांत्वन केले.याप्रसंगी पतीच्या निधनाचे अपार दुःख असतांनाही पियुषाताई भोयर यांनी देखील मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प घेऊन आपल्या सामाजिक जाणीवेचा परिचय करून दिला.हे उल्लेखनिय होय.