अकोला स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान ,नेत्रदान व अवयव दानाची दृष्टी गणेशा ही चळवळ संपूर्ण विदर्भात गणेश उत्सवाचे आकर्षण बनले आहे. दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रभात किड्स अकोला येथे दृष्टी गणेशा या सामाजिक उपक्रमाचे दिव्यांग बांधवांच्या सुरातून प्रस्तुती करण झाले. प्रभात किड्स चे संचालक डॉ. गजानन नारे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या वाद्य वृंदाला आपल्या विद्यालयात रक्तदान , नेत्रदान व अवयवदानाच्या प्रचार प्रसारासाठी आमंत्रित केले होते . प्रस्तुत कार्यक्रमात गणेश गीते ,बालगीते, संस्कार गीते व देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रमाला प्रभात च्या बालगोपालांनी भरभरून प्रतिसाद दिला . अवनी शेळके ची नृत्य प्रस्तुती, मंजिरी पांडे या बाल गायिकी ची संगीत प्रस्तुती, लक्ष्मी पानबुडे ची देशभक्तीपर गीते, प्रा.गजानन मानकर यांची बाल संस्कार गीते ,रोहित सूर्यवंशी चे शंखनाद प्रस्तुती, कैलास पाणबुडे ची तबला जुगलबंदी व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे विशाल कोरडे यांचे रक्तदान, नेत्रदान ,अवयव दानावर विशेष व्याख्यान व संगीत प्रस्तुती हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले . दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य राबवल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रभात किड्स अकोला चे संचालक डॉ. गजानन नारे यांनी सत्कार केला . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी संपूर्ण भारतभर विशेष व्यासपीठ उपलब्ध असून शाळा महाविद्यालय व विविध सामाजिक संस्थांनी या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान डॉ. गजानन नारे यांनी केले . ज्या दिव्यांग बांधवांना संस्थेच्या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती सदस्य अस्मिता मिश्रा यांनी दिली . कार्यक्रमाचे निवेदन सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे व आभार प्रदर्शन संचालिका सौ.वंदना नारे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका वृषाली वाघमारे ,धनश्री पांडे, अदिती वाडे, श्रीकांत कोरडे, विजय कोरडे ,संतोष शेळके ,नेहा पलन, अनामिका देशपांडे यांनी सहकार्य केले .