कारंजा : ज्या व्यक्तीच्या शरिराला आणि अंतःकरणाला म्हणजेच तना-मनाला केवळ आणि केवळ समाजसेवेची तडफड असते.तोच पत्रकारितेची निष्काम सेवा निवडत असतो.पत्रकारिता करणे हा व्यवसाय नसून स्वछंदाने केली जाणारी निष्काम सेवा असते.त्यामुळेच पत्रकारिता करणारी व्यक्ती सच्चा समाजसेवक म्हणून ओळखली जात असते.म्हणून देशात जवानाला आणि किसानाला जेवढे महत्व आहे.तेवढेच महत्व पत्रकाराला दिले पाहीजे. किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्व पत्रकाराला मिळाले पाहीजे. कारण पत्रकार हा स्वतःच्या घरादारावर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून,समाजात रात्रंदिवस फिरता राहून,आपल्या डोळ्यानी सुखंदु:खाचे अश्रू टिपून,त्याला आपल्या लेखनीद्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत असतो.भ्रष्टाचाराविरोधी लढा उभारुन भ्रष्टाचार रोखत असतो. शासनाला जागे करून समाजाला न्याय मिळवून देत असतो.त्यामुळे पत्रकार हा निष्काम कर्मयोगी,खरा समाजभक्त-देशभक्त असतो.परंतु दुदैवाने लोकशाही वाचवून तीला बळकट करणाऱ्या लोकशाहीच्या ह्या चौथ्या स्तंभाविषयी शासनाला आणि समाजाला सुद्धा त्याची काहीही जाण नसल्याचेच वेळो वेळी सिद्ध झाले आहे.समाजातील एखाद्या कार्यकर्त्याला नेता, नगरसेवकाला किंवा सरपंचाला आमदार खासदार मंत्री सत्ताधिश करण्याची किमया करणार्या, समाजाला वेळोवेळी न्यायहक्क मिळवून देणाऱ्या पत्रकारांविषयी कुणालाच आस्था नसल्याचे वेळोवेळी सिद्ध होत आहे.निःस्वार्थ पत्रकारितेचा छंद जोपासणाऱ्या पत्रकाराच्या आर्थिक व्यवस्थे विषयी, पत्रकाराच्या सुखदुःखाविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी कुणीच विचार करतांना दिसत नाहीत. पत्रकाराला दरदिवशी बातम्या पाठवून प्रसिद्धी मिळवून घेणारे जाहिराती आणि जाहिरातीचे पैसे देण्याला मात्र टाळाटाळ करीत असतात. जाहिरातीच्या पैशासाठी त्याला भटकंती करावी लागते.महागाईच्या ह्या काळात पत्रकाराला जगवीने शासनाचे आणि समाजाचे आद्यकर्तव्य असतांना देशाचा-समाजाचा महत्वाचा घटक असलेल्या पत्रकारांची वेळोवेळी उपेक्षाच केली जाते.तरी शासनातील आणि समाजातील लहान थोर नेत्यांनी विचारवंत होऊन यापुढे तरी लोकशाहीच्या ह्या चौथ्या आधारस्तंभाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांना जाहिरातींचा आर्थिक भक्कम आधार देवून जगवीले पाहीजे.असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.