नागभिड प्रतिनिधी : --- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत गेल्या २० ते २५ वर्षापासून महाराष्ट्रात १,७५००० शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत.आपल्या राज्यात या कर्मचाऱ्यांना मासिक २५०० रुपये मानधन दिले जाते.या तुटपुंजा मानधनामध्ये या कर्मचाऱ्याकडून पोषण आहार तयार करण्याबरोबर शाळा उघडणे, शाळेची देखभाल करणे, स्वच्छता राखणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांचे ताट धून्यापासून ते अनेक वेळेला शौचालय साफ करावे लागते इतके करूनही त्यांना महिन्याकाठी फक्त रुपये २५०० मिळतात ते ही वेळेवर मिळत नाही तर पांडेचेरी राज्यात १४ हजार रुपये दरमहा, केरळमध्ये १० हजार व तामिळनाडूमध्ये ७८०० रू.दरमहा याप्रमाणे मानधन दिली जाते. मात्र आपल्या राज्यात या कर्मचाऱ्यांना तूटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. ज्याप्रमाणे बाकीच्या राज्यामध्ये या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन दिले जातो त्याच धर्तीवर आपल्या राज्यात सुद्धा कर्मचाऱ्यांच्या मानधनात त्वरित वाढ करण्याची तरतूद येणार्या पावसाळी अधिवेशनात करावी या मागणीचे निवेदन 28 मे 2025 रोजी नागभिड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्नेहल लाड मॅडम यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना कॉ. विनोद झोडगे राज्य सचिव आयटक यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना संघटनेच्या तालुका सचिव कॉ. निर्मला गुरनुले,अध्यक्ष कॉ.संदीप मसराम, पुष्पा ठाकरे, प्रभाकर सलामे, माया खोब्रागडे,कालिदास मेश्राम, यामिना दडमल उपस्थित होते.