कारंजा: मनसेच्या अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह दोनद येथे झालेल्या रोगनिदान व रक्तदान शिबीर आयोजित कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.श्री.बच्चुभाऊ कडु यांच्या उपस्थितीत व प्रहार वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री.हेमेंद्रभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतला.या वेळी मनसेचे माजी विधानसभा अध्यक्ष अनुप ठाकरे,उपतालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर खाडे, उपतालुकाध्यक्ष अमोल घाने,उपतालुकाध्यक्ष मनिष राठोड,कृषी सेल जिल्हाध्यक्ष दिनेश गायकवाड, वैद्यकीय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ हर्षद गावंडे, सर्कलध्यक्ष अहमद शेख, मंगेश ताथोड, सर्कलध्यक्ष राहुल थेर,पुंडलिक लसनकुटे,नितीन तायडे, उमेश ताथोड, ब्रम्हदेव लाहे, निलम राठोड, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह आणि समर्थकासह प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश घेतला यावेळी प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवजांळ, प्रहार नेते गजानन लोखंडकार, वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय पाकधने , प्रहार युवा जिल्हाध्यक्ष अमोल घुले पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.