वरोरा चिमूर मार्गावर असलेल्या खातोडा या गावाजवळ दिनांक:-१७ ऑगस्ट २०२३ गुरुवार ला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना तसेच जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चारचाकी गाडी क्र. एम.एच.३४ बी.जी.१६३२ पेट्रोलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकी क्र. एम. एच.३४ बी.एल.५३१३ सह, एकूण २६ जनावरासह आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
खातोडा या गावाजवळ अब्दुल नवी अब्दुल गफार, रा. कॅलरी वार्ड, याचे शेत असून या शेतातच जनावरांच्या कत्तलीसाठी खूप मोठा बंडा बांधण्यात आला आहे. पोलीसांना खातोंडा गावाजवळ बोलेरो पिकप गाडीत मध्ये ७ जनावरे भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली, पोलीसांनी लगेच आपले सूत्र हलवित या गाडीचा शोध घेत आरोपींनी रंगेहाथ पकडले.यात आरोपी बिलाल जाकीर कुरेशी वय वर्षे १८ डोलारा.ता भद्रावती,रितिक वसंता आत्राम, वय २३ , एकर्जूना.राजेंद्र भाऊराव सोयाम वय ५५, कॉलरी वार्ड, नेहाल राजेंद्र सोयाम २६,राहणार कालरी वार्ड, वरोरा , यांना अटक केली,तसेच गोवंश तस्करीसाठी वापरण्यात आलेला आलेली ,चार चाकी वाहन अंदाजे की ६ लाख रु., पेट्रोलिंग साठी वापरण्यात आलेली दुचाकी अंदाजे किंमत ३० हजार रूपये शेतीच्या बंड्यात जवळ जवळ १९ जनावरे आढ़ळून आली. यांची किंमत ३ लाख ९० हजार, मोबाईल असे एकूण ९ लाख ५६ हजार रू चा मुद्देमालासह पोलीसांनी आरोपींनी अटक केली.यांच्यावर गोवंश तस्करी करणे गोवंशाची हत्या करणे या असे विविध गुन्हे नोंदविण्यात आले.पैकी आरोपी अब्दुल नबी अब्दुल गफार कुरेशी, रा. कॉलरी वार्ड, हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे, पोलीसांनी फरार आरोपीस पकडण्याकरिता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन आरोपपत्रसह आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने आरोपींना दिनांक १८ ऑगस्ट २०२३ ते १ सप्टेंबर २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती अर्ज नामंजूर करण्यात आला.या संपूर्ण प्रकरणाचा तपास शेगावचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या अधिपत्याखाली पोलीस करीत आहे.