कारंजा (लाड) :
मित्र हो!ऐका माझे वचन।जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण।
तरी सामुदायिक प्रार्थना-साधन सोडू नका कधीही॥
विश्वी होऊ शकेल शांतता।तेथे गावाची कोण कथा?I सामुदायिक प्रार्थनाच करील एकता।नित्यासाठी, तुकड्या म्हणे॥
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालीत श्री.गुरुदेव सेवा मंडळ,श्री.गुरुदेव महिला व पुरुष भजनी मंडळ कारंजा (लाड) तालुक्याच्या वतीने,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका गुरुकुंज मोझरी ते पंढरपूर येथे प्रचार यात्रेद्वारे जात असतांना त्यांच्या कारंजा येथील आगमनानिमित्त , कारंजा येथे श्री.गुरुदेव सेवा मंडळ परिवाराकडून भव्य दिव्य अशा मेळाव्याचे आयोजन,श्री.गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर कारंजा(लाड)येथे दिनांक १ जुलै २०२५ मंगळवार रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता मेळावा चालू होण्याच्या अगोदर सर्व प्रथम राष्ट्रसंताच्या ग्रामगीता व साहित्याच्या प्रचारीका स्वर्गीय सौ.छायाताई गावंडे, गुरुभक्त तथा सुप्रसिद्ध गोंधळी लोककलावंत स्वर्गीय श्री.उमेश मधुकर कडोळे, स्वर्गीय श्री.गौरीशंकर देवघरे, स्वर्गीय श्री.हरिभाऊ लक्ष्मणराव दुर्गे तसेच अहमदाबाद विमान अपघातामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली देऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा,कारंजा (लाड) चे माजी नगराध्यक्ष मा.अरविंद लाठीया,कारंजा (लाड) यांच्या अध्यक्षते खाली,उद्घाटक माजी नगराध्यक्ष दत्तराजजी डहाके यांचे शुभ हस्ते, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक श्रीकृष्ण पाटील नेमाने,दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सुधिर देशपांडे,दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी विजय काळे,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक करंज महात्म्यचे संपादक संजय कडोळे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर व्यवहारे,श्रीकृष्ण पाटील मुंदे, लोमेश पाटील चौधरी, डॉ. दिलीप रावजी गावंडे सौ.ज्योती ताई उगले वाशीम जिल्हा महीला सेवाधीकारी सौ.सिमाताई सातपुते महीला भजन प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.उल्लेखनिय म्हणजे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकांचे आगमन दि. ०१ जुलै २०२५ रोजी,दुपारी ०४ :०० ते ०५ :०० च्या दरम्यान श्री.गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर येथे झाले.याप्रसंगी श्री गुरुदेव आश्रम गुरुकुंज मोझरीचे मध्यवर्ती प्रतिनिधी ह.भ.प.प्रकाश महाराज वाघ, ह.भ. प.सुशील महाराज वनवे प्रचार सचिव प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रसंताच्या विचाराची तसेच ग्रामगीतेची व इतर साहित्याची आज देशाला गरज आहे.या विषयावर प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले.गुरुकुंज मोझरी ते पंढरपूर जाणाऱ्या पालखीचे पूजन सौ.राजलक्ष्मी ताई दत्तराजजी डाहाके, सौ.ज्योतीताई प्रकाश पाटील ढेरे, सौ.बेबीताई बाळू पाटील, दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रचार यात्रेमधील सेवाधाऱ्यांचा सत्कार तसेच यावेळी कारंजा येथील सर्वधर्म सामुदायिक प्रार्थना सुरू केलेल्या महिला भजनी मंडळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाविका भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.तसेच श्री.गुरुदेव सेवा मंडळ तसेच महिला पुरुष भजनी मंडळ राष्ट्रसंताच्या ग्रामगीता व इतर साहित्याचे प्रचारक गुरुदेव प्रेमी तसेच श्री.गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्या मेळाव्याला तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सायंकाळी श्री. गुरुदेव परिवाराची विशाल सर्व धर्म सामुदायिक प्रार्थना व चिंतन आरती प्रसाद राष्ट्रवंदना व जयघोष घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता रामबकस डेंडुळे भजन प्रमुख, संतोष केळकर शहर प्रमुख, बंडु पाटील दुर्गे, भास्कर पाटील ठाकरे, उमाशंकर देवघरे, संजय भाऊ ताथोड, राजेंद्र हाडके, चंदूभाऊ जाधव, श्रीमती प्रमिला ताई देशमुख, श्रीमती ज्योती ताई शेंदवकर, सौ.ललिता ताई उडाखे, भनक दादा इत्यादी कारंजा(लाड)शहरातील तसेच तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य महिल भजनी मंडळ यांनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक वाशीम जिल्हा सेवाधीकारी सुनील भाऊ दशमुखे सुत्रसंचालन कारंजा (लाड)तालुका सेवाधीकारी गणेश पाटील गांजरे तर आभार प्रर्दशन प्रसीद्धी प्रमुख विजय खंडार यांनी केले.असे वृत्त अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळ कारंजाचे प्रसिद्धी प्रमुख विजय खंडार यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....