कारंजा (लाड) : शासनाने संगोयो योजनेच्या निराधार वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांना थेट अनुदान हस्तांतरण योजनेच्या अंतर्गत महा.आय.टी.विकासात्मक संस्था (डि.बी.टी.) द्वारे प्रत्यक्ष लाभ देण्याकरीता लाभार्थ्यांना त्यांचे, मोबाईल लिंक असलेले आधारकार्ड व मोबाईल नंबरची मागणी करून त्यांचे प्रमाणिकरण प्रक्रिया सुरू केल्यामुळे व त्याकरीता दि 15 मे 2024 पर्यंतच मुदत असल्यामुळे कारंजा तहसिल कार्यालयात संगायो च्या विधवा महिला,परित्यक्त्या,दुर्धर आजार ग्रस्त,विकलांग,अंध, मुकबधीर आणि श्रावण बाळ योजनेच्या ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांची आधार प्रमाणिकरण करून, निराधार खाते अद्यावत करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.आज आमच्या महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे पदाधिकारी प्रदिप वानखडे यांनी तहसील कार्यालयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फेरफटका मारला असता ,अनेक निराधार वयोवृद्धांचा उदरनिर्वाहच शासनाच्या या योजनेवर अवलंबून असून या अनुदानाला ते पगार असे संबोधतात.गेल्या तिन चार दशकांपासून संगायो निराधार योजनेचा ही मंडळी लाभ घेत असल्याचे कळले.तसेच यामध्ये अनेक विकलांग,निराधार महिला व म्हाताऱ्या व्यक्तीकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांच्या आधार प्रमाणिकरणातही अडथडे येत असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे निराधार व्यक्तीच्या प्रमाणिकरणात व्यत्यय येऊन निराधाराचे अनुदान रोखल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.