भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळून एक जण जागीच ठार झाला. ही घटना ७ मे रोजी धानोरा - रांगी मार्गावरी पूसवांडी फाट्यावर घडली. शम्मी यार मोहम्मद शेख (५६, रा. धानोरा) असे मृताचे नाव आहे. ते दुचाकीवरुन ७ मे रोजी धानोरा येथून रांगीकडे जात होते. धानोरापासून चार किलोमीटरवरील वळणावर दुचाकी झाडाला धडकली. यात दुचाकीस्वार शम्मी शेख यांच्या डोक्याला दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालय धानोरा डॉ. देवेंद्र सावसाकडे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.