गेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीपासून महाराष्ट्रात दोन वेळा सत्तांतर झाले. परंतु जिल्ह्यातील आमदारांनी आणि कोणत्याही सत्ताधारी पालकमंत्र्यानी वाशिम जिल्ह्यातील विकासाच्या आणि लोकहिताच्या कामाकडे लक्ष्य न दिल्यामुळे जिल्ह्यातील शासकिय-निमशासकिय समित्यांचे गठन होऊ शकले नाही आणि त्यामुळे तळागाळातील, ग्रामीण भागातील, सर्वसामान्य गोरगरीब मतदार नागरिक शासनाच्या योजना सवलतींपासून गेल्या अडीच तिन वर्षांपासून वंचितच राहीलेले आहेत. आपल्या लोककलेद्वारे, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे शासनाच्या योजनांची जनजागृती आणि समाजप्रबोधन करणारा वयोवृद्ध साहित्यीक, लोककलाकार सुद्धा, जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत सांस्कृतिक विभागाची, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीच स्थापन न झाल्यामुळे शासनाच्या मानधनापासून वंचित राहीलेला आहे. त्यामुळे आता यापुढे तरी मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे आणि सर्वच आमदारांनी लवकरात लवकर निष्पक्ष अशा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आणि सच्च्या लोककलावंताची निवड करून, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे गठन करावे. तसेच सदर्हु समितीवर कोणत्याही राजकीय पक्ष कार्यकर्त्यांला घेत येत नसते . त्यामुळे जिल्हातील योग्य अशा हाडाच्या लोककलावंताचीच निवड करावी अशी विनंती, जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी मा . मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना केली आहे.