
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): गेल्या काही दिवसां पासून हवामानाचा अंदाज देणारे, वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील रुईगोस्ता येथील हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे यांचे अंदाज फारच अचूक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. 16 जुलै रोजीचे त्यांचे अंदाज योग्य ठरले असून,दि 17 व दि 18 रोजी आपल्या जिल्हयातील बहुतांश तालुक्यात त्यांच्या अंदाजानुसार दमदार पाऊस झाला असून,कारंजा मंगरूळपिर मानोरा येथील ग्रामिण भागात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झालेली आहे.परिसरातील धरणातील पाणीसाठ्याची पाणी पातळी प्रत्येक तासाला वाढत असल्याने, कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.पोहा येथील उमा नदीच्या महापुराने मुर्तिजापूर तालुक्यातील उमा धरण भरले आहे.अनेक वर्षानंतर पोहा येथील नदीला आलेल्या पूराने,श्री दुर्गादेवी संस्थान मध्ये पाणी शिरले असून,गावाचा संपर्क तुटला आहे.तसेच शेलू बाजार येथील परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावली.दमदार पाऊसाच्या आनंदाने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून,त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता नक्कीच मिटणार आहे. सध्या संपूर्ण विदर्भात चोहीकडे पाऊस सुरुच असून,हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी,सोमवार दि. 19 जुलै रोजी हवामानाबाबत अधिक अंदाज वक्त करतांना, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी दूरध्वनीवरून बोलतांना सांगीतले की,उद्या गुरुवार दि.20 जुलै रोजी सकाळी 05:00 ते 07:00 आणि दुपारी 04:00 ते 06:00 च्या दरम्यान पाऊस कोसळणार असून,दुपारनंतर वाशिम जिल्ह्यात कोठेतरी आणि महाराष्ट्रातही विजा कोसळण्याची शक्यता असून,त्यामुळे सावधानता बाळगून, शेतकरी शेतमजूर,गुराख्यांनी आपली शेतमजूर,जनावरे दुपारपूर्वीच घरी आणावीत.दुपारनंतर शेतामध्ये कुणीही थांबू नये.कारण विजांसह पाऊस पडणारच आहे.तसेच 20 जुलै पासून,दि.31 जुलै पर्यंत दररोज विदर्भ,मध्य महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे.तरी विजांपासून आणि पाऊसापासून स्वतःचे,आपल्या कुटुंबाचे,जनावरांचे संरक्षण करण्याकरीता शेतात जाणाऱ्या शेतकरी शेतमजूरांनी,पावसाचे अंदाज ओळखून,येत्या काही दिवस विजांसह,कोठे कोठे तर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचे अंदाज असल्यामुळे आपल्या शेतातील कामे सकाळ पासून,दुपारपर्यंतच पूर्ण करावीत.व मध्य दुपारपर्यत शेतातून परत घरी यावे. दुपारनंतर शेतात शेतकरी,शेतमजूर,गुराखी,जनावरे यांना थांबवू नये.पूराच्या प्रवाहात नदी,नाला,ओढ्यातून जावू नये. जनावरे,बैलगाड्या,सायकल, मोटार सायकल,कार आणि बसेस ही वाहने,नदीनाल्याला पूर असतांना पुलावरून,रस्त्यावरून चालवू नये.असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....