वाशिम : प्रादेशिक मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि . ५ मार्च ते ७ मार्च दरम्यान विदर्भातील सर्वच जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यात विजाच्या कडकडाटासह अतिवृष्टी व वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवावा.तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरीता आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. विज व गारांपासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी दिले आहे.