कारंजा लाड - समाजसेवेचा अखंड वसा घेतलेली नाथ समाजाची मानवसेवी संघटना म्हणजे वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट कारंजा. या संस्थेच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील पहिला राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळा स्थानिक महेश भवन येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी स्थानिकच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या अध्यक्षतेखाली व आदरणीय आमदार हरीश भाऊ पिंपळे , विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष आदर्श समाजसेवक संजयभाऊ कडोळे ,स्वागताध्यक्ष गिरधारीलालजी सारडा, सहस्वागताध्यक्ष निलेशजी सोमानी तसेच वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. पूनम एकनाथ पवार व सचिव एकनाथ पवार यांचे उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी संपूर्ण राज्यभरातून 27 जिल्ह्यांमधून विविध क्षेत्रातील शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय कला साहित्य क्रीडा शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय तथा भरीव कामगिरी केली आणि समाजसेवेला समर्पित सेवाव्रती कार्य केले.अशा समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण व विदर्भभूषण व मराठवाडाभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पुरस्कारार्थींच्या कुटुंबातील सदस्य तथा तालुक्यातील सन्माननीय पत्रकार मंडळी उपस्थित होती.