शेतकऱ्यासाठी सन्मान योजना विविध योजना सुरू करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जात-पाच धर्म पेक्षा संस्कृती आणि राष्ट्र निर्माण मध्ये कार्य करणारे मोदी यांच्या गॅरंटीवर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांना विजयी करून गेल्या दहा वर्षात केलेल्या संजय धोत्रे यांच्या विकास कार्य व स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व गोवर्धन शर्मा यांचे इच्छापूर्ती साठी अनुप धोत्रे यांना खासदार बनवण्यासाठी कार्यकर्ते व अकोल्यातील नागरिक सज्ज असून पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांनी निवडलेले उमेदवारांच्या पाठीशी सर्व नागरिक सज्ज असल्याचे प्रतिपादन आकाश फुंडकर यांनी केले.
बाळापुर तालुक्यातील कोळसा देवगाव कसुरा निंबी या गावांना त्यांनी भेटी दिल्या व मतदारांची संवाद साधून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील, माधवमाधव म्हैसने,किशोर कुचके,गणेश तायडे,पंकज पळसपगार, विपुल घोगरे, राजू वैराळे,अंबादास घेगे,उमेशअप्पा भुसारी, श्यामराव शेलार,ध्यानेशर मानकर,जीवन धर्माळे, दीपक घोंगेसंजय उघडते,नितीन लांडे,अनंता हरणे, मनीष वैराळे,शिवाजी ठाकरे,प्रमोद वानखडेविठ्ठल दही आधी सोबत होते.
सातत्याने दोन महिन्यापासून किशोर पाटील जिल्हाध्यक्ष बाळापुर तालुक्यात गावोगावी जाऊन तसेच पातुर जिल्ह्यातील प्रत्येक बुथ केंद्रावर जाऊन मतदारास व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे