कारंजा लाड:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अल्पावधीतच असंख्य बालनाट्य तथा दोन अंकी नाटकात विविधांगी भूमिका साकारून अनेक पारितोषिक प्राप्त करून पंचक्रोशीत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या कु.राधिका निलेश रामदेवकर या बाल कलावंत हिचा पंचवटी मित्र मंडळ कडून गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,राधिकाने एक राज्य अंध्याचं, मरिआईच्या नावानं, उंच माझा झोका,खेळ,इस्कोट,रान पाखर एक्सपायरी डेट, गुहेतील पाखरे अशा विविध नाटकात विविधांगी भूमिका साकारल्या असून कारंजे सारख्या ग्रामीण नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असल्याबद्दल तिचे कौतुक करतांना भारावून गेल्याचे उद्गार पंचवटी मित्र मंडळाने केले आहे नाट्य क्षेत्रात कोणतेही मार्गदर्शक नसतांना तिचे योगदान सराहनिय आहे राधिकाच्या यशाबद्दल विदर्भलोक कलावंत यांनी कौतुक केले आहे.